• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 11, 2026
in Uncategorized
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

पारोळा, 10 ऑक्टोबर: एरंडोल विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘जलतारा’ अभियानाच्या पायलट प्रकल्पाला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विशेष संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पारोळा, एरंडोल आणि भडगाव या तीन तालुक्यांतील निवडक गावांमध्ये जलसंवर्धनाची कामे हाती घेण्यात आली असून काल 10 ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यशाळांसोबत एरंडोल तालुक्यातील खडकेसीम, पारोळा तालुक्यातील वाघरे आणि भडगाव तालुक्यातील आंचळगाव येथे JCB व अन्य यंत्रसामग्रीच्या साहाय्याने प्रत्यक्ष जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात करण्यात आली.

एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून या पायलट प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत पाणी मुरविणे, भूजल पातळीत वाढ घडवून आणणे आणि शेतीसाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

तीन तालुक्यांत कार्यशाळा आणि प्रत्यक्ष कामांचा प्रारंभ –

जलतारा अभियानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात काल, शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी तीनही तालुक्यांमध्ये विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. एरंडोल तालुक्यात खडकेसीम येथे सकाळी १० ते दुपारी १२, पारोळा तालुक्यात वाघरे येथे दुपारी १ ते ३ आणि भडगाव तालुक्यात आंचळगाव येथे सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या.

या कार्यशाळांदरम्यान संबंधित ठिकाणी जलसंवर्धनाच्या कामांनाही प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. JCB व अन्य यंत्रसामग्रीच्या माध्यमातून आवश्यक कामे हाती घेण्यात आल्याने जलतारा अभियानाने नियोजनाच्या टप्प्यातून प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वाटचाल सुरू केली आहे.

या कार्यक्रमांमध्ये जलतारा संशोधक तथा अध्यक्ष, जलसंवर्धन सेना पुरुषोत्तम वायाळ आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रकल्प समन्वयक दादासाहेब थेटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आमदार ॲड. अमोल पाटील यांनीही कार्यशाळेला संबोधित करत जलसंवर्धनाच्या कामांचे महत्त्व स्पष्ट केले आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

एरंडोल विधानसभा मतदारसंघात पायलट प्रकल्प –

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी दीर्घकालीन आणि शास्त्रीय उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने जलतारा अभियानाची संकल्पना पुढे आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विशेष संकल्पनेतून एरंडोल विधानसभा मतदारसंघात हा पायलट प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आमदार अमोल पाटील यांनी पुढाकार घेतला असून, मतदारसंघातील जलस्रोतांचा अभ्यास करून आवश्यक त्या ठिकाणी जलसंवर्धनाची कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविणे, नैसर्गिक जलप्रवाहांचे संवर्धन करणे आणि भूजल पातळी वाढविणे यावर या अभियानात भर दिला जाणार आहे.

तीन तालुक्यांतील १२ गावांचा समावेश –

या पायलट प्रकल्पासाठी पारोळा तालुक्यातील मेहू, टेहू, वाघरा-वाघरी आणि धुळपिंप्री; एरंडोल तालुक्यातील उमरे, मालखेडा, टोळी खुर्द आणि खडकेसीम; तर भडगाव तालुक्यातील आंचळगाव, धोत्रे, तळबंद तांडा आणि वसंतवाडी या 12 गावांची निवड करण्यात आली आहे.

या गावांमध्ये प्रत्यक्ष स्थळपाहणी करून नाले, नैसर्गिक जलप्रवाह, पाणलोट क्षेत्र, शेतीची स्थिती, भूजल पातळी आणि पाणी साठवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या संभाव्य ठिकाणांचा अभ्यास केला जाणार आहे. तांत्रिक निकष आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन जलसंवर्धनाच्या कामांचे नियोजन केले जाणार आहे.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून शास्त्रीय जलसंवर्धन –

जलतारा संशोधक तथा अध्यक्ष, जलसंवर्धन सेना पुरुषोत्तम वायाळ यांनी अभियानाची संकल्पना, शास्त्रीय जलसंवर्धन पद्धती आणि प्रत्यक्ष कामांची कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रकल्प समन्वयक दादासाहेब थेटे यांनीही प्रकल्पाच्या नियोजनासाठी आणि विविध घटकांमधील समन्वयासाठी मार्गदर्शन केले.

प्रत्येक गावातील संभाव्य जलसंवर्धन स्थळांची निश्चिती करून त्यांची GPS लोकेशनसह नोंद केली जाणार आहे. त्यानुसार कामांचे प्राधान्यक्रम ठरवून आवश्यकतेनुसार JCB व अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने जलसंवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा सहभाग या प्रक्रियेत महत्त्वाचा राहणार आहे.

आमदार अमोल पाटील यांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार –

कार्यशाळेला संबोधित करताना आमदार ॲड. अमोल पाटील यांनी मतदारसंघातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली. पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरविणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत मतदारसंघात जलसंवर्धनाच्या कामांना गती मिळावी यासाठी आमदार अमोल पाटील अथक परिश्रम घेत आहेत. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समन्वय आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यांच्या माध्यमातून हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

बातमी शेअर करा !
Share
Tags: erandol assembly constituencyjaltara campaign¸mla amol patilmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

October 10, 2026
जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page