सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 3 मे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे राज्यात विविध ठिकाणी दौरे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुक्ताईनगर येथे खासदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. तसेच बावनकुळे यांनी पारोळा येथे माजी खासदार ए.टी पाटील यांची भेट घेत भाजप तालुका पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मंगेश तांबे यांनी भाजपात प्रवेश केला.
मंगेश तांबे यांचा भाजपात प्रवेश –
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पारोळा येथे दिलेल्या भेटी दरम्यान माजी उपनगराध्यक्ष तथा पारोळा वि. का. सोसायटी चेअरमन मंगेश तांबे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी खासदार ए.टी. पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे, स्वप्नील चंद्रकांत शिरोळे तसेच अतुल पवार यांच्यासह भाजपमधील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील नाराज? चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली भेट, नेमकं काय कारण?