शिरसगाव (चाळीसगाव), 26 ऑक्टोबर : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सराकारला दिलेली मुदत संपल्याने कालपासून मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंब्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी साखळी उपोषणाला सुरू आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसेंची भेट –
चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथे सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरू आहे. उपोषणकर्ते दिलीप पाटील यांचा साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते (शरद पवार गट) तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज उपोषणस्थळी भेट दिली. माजी मंत्री खडसे यांनी उपोषणकर्ते दिलीप पाटील तसेच उपस्थितांसोबत मराठा आऱक्षणासंदर्भात चर्चा केली.
याप्रसंगी याप्रसंगी जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोदबापु पाटील, मा.जि. प. सदस्य भूषणभाऊ पाटील, माजी सैनिक विकासतात्या पाटील उपस्थित होते.