• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चाळीसगाव

मराठा आरक्षणाची मागणी, चाळीसगाव तालुक्यातील आडगावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 25, 2023
in चाळीसगाव, ताज्या बातम्या
मराठा आरक्षणाची मागणी, चाळीसगाव तालुक्यातील आडगावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

आडगाव (चाळीसगाव) 25 ऑक्टोबर : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनाची मुदत 24 ऑक्टोबरला संपली आहे. परंतु, याबाबत सकारात्मक निर्णय झाला नसल्याने मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा आमरण उपोषणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांनी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील आडगावातही अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाचा लढा शांततेत द्या –
चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील मराठा समाजाचे कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी आडगाव येथील मराठा समाजबांधवांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला. यावेळी ते म्हणाले की, कोणाच्यातरी सांगण्यावरून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, मराठा बांधवांनी आरक्षणाच्या लढ्यामध्ये कुठेही गालबोट न लागू देता हा लढा शांततेत दिला पाहिजे. तसेच कुठल्याही परिस्थितीत आम्ही सरकारकडून आरक्षण मिळवूनच राहू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा –
मराठा आरक्षणाबाबत दिलीप पाटील यांनी आज सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजला प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, शिरसगाव येथे सकल मराठा समाजातर्फे 25 ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवस साकळी उपोषणाला सुरूवात होणार आहे. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास चौथ्या दिवसापासून (28ऑक्टोबर) आमरण उपोषणाला बसणार असण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाची मागणी मान्य केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सरकारला दिलेली मुदत संपली –
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सरकारला आरक्षणासाठी चाळीस दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता संपल्यावर जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: manoj jarangemaratha andolanmaratha arakshan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरतमध्ये बस अपघात: ७ जणांचा दुर्दैवी अंत; मदतीसाठी जळगावचे पथक रवाना, एसटी महामंडळाकडून आर्थिक मदतीची घोषणा

सुरतमध्ये बस अपघात: ७ जणांचा दुर्दैवी अंत; मदतीसाठी जळगावचे पथक रवाना, एसटी महामंडळाकडून आर्थिक मदतीची घोषणा

June 3, 2026
78 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड पोहोचवली सेवा; एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

78 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड पोहोचवली सेवा; एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

June 2, 2026
जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

June 1, 2026
जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

June 1, 2026
IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

June 1, 2026
सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page