जळगाव, 26 ऑक्टोबर : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर हे सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी धरणगाव येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित धरणगाव शहरातून ऐतिहासिक रॅली सुद्धा निघणार आहे. जळगाव तसेच धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्या लक्षणीय असून, आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी यंदा कोणत्याही परिस्थितीत जळगाव ग्रामीणमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार सर्व तरूणांनी केल्याचे सांगितले जात आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर आव्हान –
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर यांचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुलाबराव पाटील तसेच गुलाबराव देवकर यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आगामी काळात ही लढत अधिक रंगत होणार आहे.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीतील ‘या’ मतदारसंघाचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला, ‘यांना’ मिळाली उमेदवारी