पाचोरा, 22 फेब्रवारी : ‘सुवर्ण खान्देश’ने चांगल्या पद्धतीने परिसरातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले, असे प्रतिपादन माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी केले. तसेच दुसाने बंधूंना मी अशी विनंती करेन की, शोध पत्रकारितेकडे लक्ष दिले पाहिजे. बातम्या देताना पडताळून घेतल्या पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आपली याठिकाणी राहील, असे म्हणत माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी शुभेच्छा दिल्या.
सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचा द्वितीय वर्धापन दिनाचा कार्यक्रम काल पाचोरा शहरातील महालपुरे मंगल कार्यालय याठिकाणी संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निवृत्ती गायकवाड हे होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाला प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, पाचोरा नायब तहसिलदार विनोद कुमावत, भडगावचे नायब तहसिलदार रमेश देवकर, पाचोऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हा परिषद सदस्य मधुकाटे, पाचोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्वीय सहायक मयुर येवले उपस्थित होते. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासोबत इतर मान्यवरांनीही यावेळी आपली मते मांडली.
आता जी आपण चित्रफित पाहिली, त्या छोट्याशा चित्रफितमध्ये या चॅनेलने मागच्या दोन वर्षांपासून केलेली जागरुकता, त्यांची कर्तबगारी पाहायला मिळाली. अत्यंत चांगल्या पद्धतीने या चॅनेलने प्रगती केलेली आहे. या चॅनेलचे काम पाहणारे खुशाल आणि चंद्रकांत या दोघांनी चांगल्या पद्धतीने पाचोरा, भडगाव तसेच जळगाव जिल्ह्यात समाजपयोगी, लोकहिताचे काम करत परिसरातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले. यापुढेही त्यांच्याकडून अशीच सेवा याठिकाणी होत राहो, अशा शुभेच्छा माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी दिल्या.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पत्रकारितेच्या बाबतीत मोहिते साहेबांनी पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता याबाबत एक खंत व्यक्त केली. पण फक्त पत्रकारिताच नाही, तर सगळ्याच गोष्टींमध्ये फरक पडला. जुनी माणसं असतील किंवा जुनं राजकारण असेल, राजकीय, सिनेमा, पत्रकारिता किंवा शेती असेल, सगळ्याच क्षेत्रात बदल घडत गेले. जसं तुम्ही सांगितलं की, पत्रकारितेचा एक काळ उभा होता की, आर. आर. आबासारख्या माणसाने पत्रकारितेच्या दबाबामुळे राजीनामा दिला. मात्र, आता रोज मीडिया ट्रायल होऊनही राजीनामा दिला जात नाही. सगळ्याच चॅनेलला बातमी लावली की बीड जिल्ह्यातीलच बातम्या येतात. दुसऱ्या कोणत्याच बातम्या नाहीत. म्हणजे इतर महाराष्ट्रातील प्रश्नच नाही, अशी परिस्थिती आपल्या समोर दिसते. आका, फाका जोरदार मीडिया ट्रायल सुरू आहे. मात्र, काही परिणाम होत नाही. म्हणून स्थानिक पातळीवर जी पत्रकारिता आपण करतो, त्यात दुसाने बंधूंना मी अशी विनंती करेन की, शोध पत्रकारितेकडे लक्ष दिले पाहिजे. बातम्या देताना पडताळून घेतल्या पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आपली याठिकाणी राहील, असे म्हणत माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा सत्कार सुवर्ण खान्देशचे विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुसाने यांनी केला.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ यावेळी पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी तर आभार सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुसाने यांनी मानले. यावेळी सुवर्ण खान्देशचे मुख्य संपादक शशिकांत दुसाने, चंद्रकांत दुसाने यांचा लासगाव ग्रामपंचायतीच्या वतीने, पाचोरा पत्रकार संघाच्या वतीने, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि महिला अपराध नियंत्रण संघटनेच्या पाचोरा टीमच्या वतीने, कल्पेश टीचे जगन्नाथ महाजन, एसएसआर ट्रेडर्सचे रकीब देशमुख सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – ‘समाजाची गरज ओळखून पत्रकारिता करण्याची गरज’, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिपादन