संदीप पाटील, प्रतिनिधी
18 एप्रिल, 2024 : आई हॉस्पिटल व सोनोग्राफी सेटर तसेच फिजिओ थेरफी सेंटर व आई फाउंडेशन तर्फे सप्तश्रुंगी माता यात्रोत्सवासाठी गडावर पायी जाणाऱ्या भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. पारोळा शहरातील उंदीरखेडा रस्त्यावरील भवानी माता मंदिराजवळ काल रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिराचे उदघाट्न आई हॉस्पिटल संचालिका डॉ. वैशाली नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरातील भक्तांची मोफत तपासणी करून गरजुंना मोफत इंनजेक्शन देण्यात आले. सर्व भक्तगणांना मोफत ओषध वाटप करण्यात आले.
धनंजय पाटील, हेमंत जाधव, रोशनी नाईक, आर्य (दादू ) शिबिरास उपस्थित होते. शिबिराचे आयोजन जितेंद्र पाटील, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, पारोळा यांनी केले. शिबीराचे आयोजन 17 व 18 एप्रिल असे दोन दिवस करण्यात आले आहे.
हेही वाचा : Ram Navami : पारोळा येथे विविध ठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी