सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 18 एप्रिल : शहरात विविध ठिकाणी श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोठे राम मंदिर येथे श्रीराम जन्म उत्सवाअंतर्गत सजवलेल्या झोपाळ्यात श्री रामलल्लाची प्रतिमा स्थापन केली होती. दुर्गा वहिनी, वनवासी कल्याण आश्रम आणि सुंदर कांड समिती महिला सदस्य यांनी पाळणा गीत गाऊन जन्मोत्सव साजरा केला.
याप्रसंगी मंदिराचे मुख्य पुजारी हरिनारायण मिश्रा यांनी रामलल्लाची पूजा करून आरती करण्यात आली. याप्रसंगी गोपाल अग्रवाल, कल्पेश अग्रवाल, अॅड. दत्ताजी महाजन, डॉ. संभाजीराजे पाटील, पोलिस निरीक्षक सुनील पवार, बाळासाहेब पाटील, भिका चौधरी, मिलिंद मिसर, अॅड. तुषार अशोक पाटील, अभय पाटील, प्रतीक मराठे, नितीन सोनार यांनी महाआरतीत सहभाग घेतला. प्रा. शैलेश पाटील, अरुण भोई, प्रकाश पाटील, गोपीचंद चौधरी यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. येथे हजारो भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले.
श्री बालाजी मंदिर येथे विश्वस्त श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते श्रीरामाची पूजा हरीश पाठक यांनी करून घेतली. तसेच चिमुकले राम मंदिर, छोटे राम मंदिर, जनार्दन मंदिर त्याचप्रमाणे श्री सत्यनारायण मंदिर येथे पुजारी त्रंबक पुजारी यांनी श्रींचा अभिषेक करून या सर्व ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हेही वाचा : ना मुंबई, ना पुणे, ना कोणता क्लास, तरी त्यानं करुन दाखवलं, पिंपळगावचा विशाल बनला PSI