• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथे साश्रुनयनांनी शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 5, 2026
in जळगाव जिल्हा, खान्देश, ताज्या बातम्या, पारोळा
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

जळगाव, 5 सप्टेंबर: पारोळा तालुक्यातील कोळपिंप्रीचे भूमिपुत्र वीर जवान लान्स नायक रोहित नारायण पाटील यांच्या पार्थिवावर काल 4 सप्टेंबर रोजी कोळपिंप्री येथे साश्रुनयनांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी शहीद जवानाला मानवंदना देत अखेरची सलामी दिली.

भारतीय सैन्य दलातील १ पॅरा (स्पेशल फोर्सेस) युनिटमध्ये कार्यरत असलेले सैनिक क्रमांक २१०१०२९४X लान्स नायक (GD) रोहित नारायण पाटील यांना दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी हरियाणा राज्यातील यमुनानगर येथील हथिनी कुंड बॅरेज परिसरात सैन्याच्या प्रत्यक्ष मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या युद्धाभ्यासादरम्यान वीरमरण आले.

लान्स नायक रोहित पाटील हे चिनूक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरू असलेल्या डायव्हिंग व हेलोकास्टिंग सरावात सहभागी झाले होते. पाण्याखालील डायव्हिंग व हेलोकास्टिंग प्रशिक्षणादरम्यान त्यांना वीरमरण आले.

शहीद लान्स नायक रोहित पाटील यांचे पार्थिव काल 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता  लष्करी वाहनातून त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कोळपिंप्री, ता. पारोळा, जि. जळगाव येथे आणण्यात आले.

पार्थिव गावात दाखल होताच कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. अमर रहे, अमर रहे “शहीद जवान अमर रहे”, “भारत माता की जय” अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्या.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कुटुंबीयांचे केले सांत्वन –

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहीद वीर जवान लान्स नायक रोहित पाटील यांच्या पार्थिवावर पुष्प चक्र अर्पण केले, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पुष्प चक्र अर्पण केले. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी शहीद जवान यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान शहीद लान्स नायक रोहित पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पारोळा पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आली तसेच भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना देत शाहिद वीर जवानाला अखेरची सलामी दिली.

याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निलेश पाटील, पारोळा तहसीलदार उल्हास देवरे, सैनिक कल्याण संघटक विश्वनाथ उगले, परिसरातील, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी,  प्रशासकीय अधिकारी, लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी, एन. सी सी सैनिक शाळेचे विध्यार्थी, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहीद लान्स नायक रोहित पाटील यांच्या बलिदानाने कोळपिंप्रीसह संपूर्ण पारोळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. देशसेवेसाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानाच्या शौर्याला आणि त्यागाला जिल्हावासीयांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

हेही वाचा: शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

बातमी शेअर करा !
Share
Tags: funeral ritesmartyred soldier lance naik rohit patilparola newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page