• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

स्थलांतरित कामगारांसाठी मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश; म्हणाले, ते कुठल्याही राज्यातील असले तरी…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 31, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Give smart ration cards to migrant workers on priority Chief Minister Devendra Fadnavis directed

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या कामांचा आढावा

मुंबई : स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावे. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असले तरी त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही रास्त-भाव दुकानात धान्य मिळेल, असे नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल याबाबतचा आढावा घेतला.

स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण करण्यात यावे –

अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावेत, सर्व शिधापत्रिका धारकांना स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण करण्यात यावे. लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीने ‘एक गाव एक गोदाम’ उभारण्याची कार्यवाही सुरू करावी, वाहनांचे जिओ टॅगीग करावे, अन्नधान्य वाटपामध्ये ‘एक देश एक शिधापत्रिका’ धोरण राज्यात राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य देण्यात यावे. गरजू लाभार्थ्यांचा सण उत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी राज्यात सणांच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो. या वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

Dr. Dnyaneshwar Mulay ओडिशाच्या निलिमारांनी साहित्य पुरस्काराचे मानकरी, Exclusive Interview

आगामी वर्षात 25 लक्ष नवीन लाभार्थ्यांचे सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी समावेशन करून त्याचे ई-केवायसी करून प्रमाणीकरण करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मागील 6 महिन्यात एकदाही अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करावी, शिधापत्रिकामधून मृत व्यक्ती वगळाव्या, 100 पेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेरतपासणी करावी, तसेच संगणकीकृत न झालेल्या 14 लक्ष लाभार्थ्याचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Success Story : भाऊ-बहिणीची सैन्यदलात निवड; एकाच कुटुंबातील 4 भावंडं देशसेवेसाठी सज्ज

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavismantralayamumbairation cardsahyadri atithigruhsanjay sawkare

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
बहुलखेडा येथे पीएसआय संजय तडवी यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप

बहुलखेडा येथे पीएसआय संजय तडवी यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप

July 14, 2026
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्ह्यात 15 जुलै रोजी रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रातील २०७ हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्ह्यात 15 जुलै रोजी रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रातील २०७ हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

July 14, 2026
VIDEO | कापूस क्रांतीची नवी दिशा! कमी अंतरावरील घनलागवडीने उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाचा प्रयत्न; पाचोरा तालुक्यात 1 हजार 280 हेक्टरवर प्रयोग

VIDEO | कापूस क्रांतीची नवी दिशा! कमी अंतरावरील घनलागवडीने उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाचा प्रयत्न; पाचोरा तालुक्यात 1 हजार 280 हेक्टरवर प्रयोग

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page