• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नार-पारचा विषय, शेतीला पाणी; आमदार रामदादा भदाणेंनी मांडला शेतकऱ्यांचा मुद्दा, मंत्री गिरीश महाजनांनी काय उत्तर दिलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 15, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, धुळे
Government is trying to fill the water deficit in the Girna sub-basin - Water Resources Minister Girish Mahajan

नार-पारचा विषय, शेतीला पाणी; आमदार रामदादा भदाणेंनी मांडला शेतकऱ्यांचा मुद्दा, मंत्री गिरीश महाजनांनी काय उत्तर दिलं?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 15 जुलै : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. यामध्ये काल धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाणे यांनी नार-पार-गिरणा वळण योजनेच्या माध्यमातून ३.५ टी.एम.सी. पाण्याची उपलब्धता वाढवून, धुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांना नियमित व हमखास पाणी मिळावे, अशी महत्त्वाची मागणी केली. यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी राम भदाणे यांच्या मागणीवर उत्तर दिले.

काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन? –

तापी खोऱ्यातील गिरणा उपखोरे हे सर्वाधिक पाण्याची तूट असणारे खोरे आहे. या उपखोऱ्यात ४० टीएमसी पाण्याची तूट आहे.  ही तूट भरून काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. धुळे जिल्ह्यातील सिंचनाबबत सदस्य रामदादा भदाणे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेत सदस्य अनिल पाटील यांनीही उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नार- पार – गिरणा नदीजोड प्रकल्प अतर्गत १०.४९ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. काही तांत्रिक कारणास्तव पार- तापी- नर्मदा हा आंतरराज्य प्रकल्प रद्द करण्यात झाला आहे.  हा प्रकल्प रद्द झाला असला तरी उपलब्ध होणारे पाणी तापी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या अनुषंगाने तांत्रिक आर्थिकदृष्ट्या तपासणी सुरू आहे. यामधून  उपखोऱ्यात ९.६७ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन सुरू आहे.  तांत्रिकदृष्ट्या तपासणी करून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे.

धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा आणि सुलवाडे – जामफळ उपसा सिंचन योजना पुरेसा निधी देण्यात आलेला आहे.  हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यात पाणी आरक्षणाबाबत गतीने कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. गिरणा खोऱ्यातील सिंचन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आणखी उपयोजना सुचवून सिंचनाचा प्रश्न सकारात्मकरित्या सोडवण्यात येईल,असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

आमदार राम दादा भदाणेंची मागणी – 

काल विधानसभेत बोलताना आमदार रामदादा भदाणे यांनी धुळे तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी सूचना मांडली. नार-पार-गिरणा वळण योजनेच्या माध्यमातून ३.५ टी.एम.सी. पाण्याची उपलब्धता वाढवून, धुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांना नियमित व हमखास पाणी मिळावे, पाण्याची शाश्वती बळी राजात निर्माण व्हावी आणि हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली यावं, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. त्यांच्या या मागणीवर याबाबत लवकरच शासन यावर निर्णय घेणार आहे, असे उत्तर मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: agriculturedhuledhule ruralfarmergirish mahajanmaharashtra assembly mansoon sessionmaharashtra assembly mansoon session 2025nar parram bhadaneram bhadane patilram dada bhadanewater

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे निधन; वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे निधन; वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

December 20, 2025
किस्से लोकभवनाचे | “….अन् राजभवनात आमदारांची शिरगणती झाली!”, मार्च 1978 साली पार पडलेल्या विधानभसा निवडणुकीनंतरचा किस्सा नेमका काय?

किस्से लोकभवनाचे | “….अन् राजभवनात आमदारांची शिरगणती झाली!”, मार्च 1978 साली पार पडलेल्या विधानभसा निवडणुकीनंतरचा किस्सा नेमका काय?

December 20, 2025
प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 20, 2025
रावेर लोकसभा क्षेत्रातील आरोग्य पायाभूत सुविधांसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची महत्त्वपूर्ण मागणी

रावेर लोकसभा क्षेत्रातील आरोग्य पायाभूत सुविधांसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची महत्त्वपूर्ण मागणी

December 20, 2025
बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी बंधनकारक – सचिव तुकाराम मुंढे

बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी बंधनकारक – सचिव तुकाराम मुंढे

December 20, 2025
राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात; उद्या निकाल

राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात; उद्या निकाल

December 20, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page