सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 14 मे : भाजपच्या पारोळा-एरंडोल विधानसभा निवडणूक प्रमुखपदी गोविंद शिरोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गोविंद शिरोळे हे उद्योजक असून ते पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष देखील राहिलेले आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वीच जळगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिरोळे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दरम्यान, त्यांची भाजपच्या वतीने पारोळा-एरंडोल विधानसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.