धुळे, 15 एप्रिल : समता शिक्षण संस्था संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय, मोराणे, धुळे येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ हे होते. सुरुवातीला प्रस्ताविकेत महामानव, भारतरत्न आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल, मानव मुक्तीच्या महान लढ्याबद्दल आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून नवीन समताधिष्टीत समाज निर्मिती च्या पायाभूत कार्याबद्दल उपस्तितांना माहिती देण्यात आली.
प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ सह उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी बाबासाहेब यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर प्रा. गजेंद्र जगदेव यांनी सामूहिक त्रिशारण आणि पंचशील सादर करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप झाला.
हेही वाचा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, जाणून घ्या एका क्लिकवर ठळक घोषणा