• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी; पालकमंत्र्यांच्या सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 5, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी; पालकमंत्र्यांच्या सूचना

जळगाव, 5 मे : खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खरीपपूर्व नियोजन बैठक अत्यंत महत्त्वाची असून ही प्रक्रिया केवळ औपचारिकता नसून शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षभराच्या श्रमाचे नियोजन असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी दिलेली जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडावी. अधिकारी व कर्मचारी यांनीही ही बाब लक्षात घेऊन काम करावे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे सांगून खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथे जळगाव व धरणगाव तालुक्यांकरिता संयुक्त खरीपपूर्व नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी बदलत्या हवामान व संभाव्य खरीप आव्हानांवर चर्चा करत शेतकऱ्यांना शाश्वत, शास्त्रशुद्ध शेतीसाठी सज्ज राहण्याचे मार्गदर्शन केले.

पालकमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन –
यंदा तापमान अत्यंत वाढले असून मशागतीची कामे शक्यतो सकाळी लवकर पूर्ण करावीत. निसर्गचक्र बदलत असल्याने धूळपेर टाळावी आणि बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी आंतरपीक व मिश्रपीक पद्धती अवलंबाव्यात. अनधिकृत कंपन्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत. खरेदीचे पक्के बील घेऊन ते हंगाम अखेरपर्यंत सुरक्षित ठेवावे. गावपातळीवरील कृषी सहाय्यक व विस्तार अधिकाऱ्यांनी नियमित शेतशिवार भेटी द्याव्यात, तसेच सेवा कार्य अधिक गतिमान होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व इतर रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांना दिले.


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थी – पूजा संदीप भालेराव, सुनंदा अशोक सपकाळे व गणेश लक्ष्मण सपकाळे यांना सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात आले. अपघातग्रस्त कुटुंबांना बियाणे व निविष्ठा मोफत वितरित करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीदरम्यान कुवारखेडे येथील शेतकरी वंदना श्रीराम पाटील यांना थ्रेशर, तर दिलीप सोनवणे व हिराबाई कोळी यांना ट्रॅक्टर वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला.

विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी सांगितले की, नाशिक विभागातील खरीपपूर्व नियोजन बैठकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातून होत असून शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आवश्यक निविष्ठा पोहोचविण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने घेतले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी आत्मा व कृषी विभागाच्या वर्षभरातील कार्याची सविस्तर रूपरेषा मांडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित भामरे व श्रीमती सुरेखा सपकाळ यांनी केले. आभारप्रदर्शन कृषी अधिकारी शरद पाटील यांनी मानले. या बैठकीस प्रकल्प उपसंचालक आत्मा नाशिक विलास सोनवणे, कार्यक्रम समन्वयक हेमंत बाहेती, तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी सरला पाटील, कृषी अधिकारी धीरज बढे, किरण देसले, शरद पाटील, वैभव सूर्यवंशी, तुषार गोरे, दीपक नागपुरे, नरेंद्र पाटील तसेच कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही पाहा : पुण्याची ऋतुजा NDA च्या परिक्षेत देशात पहिली; परिक्षेच्या तयारीबाबत सांगितली अभ्यासपूर्ण माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: agriculture departmentguardian minister gulabrao patiljalgaon newskharif seasonsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 26, 2025
रूग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ तसेच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना निवदेन

रूग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ तसेच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना निवदेन

June 26, 2025
महाराष्ट्रासाठी खूशखबर! वीज स्वस्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, नेमकी बातमी काय?

महाराष्ट्रासाठी खूशखबर! वीज स्वस्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, नेमकी बातमी काय?

June 26, 2025
किनारपट्टी भागात पावसासाठी पोषक वातावरण; राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, जळगावचा हवामान अंदाज काय?

किनारपट्टी भागात पावसासाठी पोषक वातावरण; राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, जळगावचा हवामान अंदाज काय?

June 26, 2025
Pachora News : शिक्षकाची शाळेतच आत्महत्या, पाचोरा शहरातील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

आर्थिक शिस्त, गतिमान प्रशासनासाठी समितीची प्रभावी कार्यपद्धती ठरविणार – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

June 25, 2025
Pachora News : पाचोरा परिवहन विभागातर्फे पाचोरा एस एस एम एम कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत पास वाटप

Pachora News : पाचोरा परिवहन विभागातर्फे पाचोरा एस एस एम एम कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत पास वाटप

June 25, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page