जळगाव, 24 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कडाक्याचं ऊन पडतंय. या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असताना बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जळगाव जिल्ह्यात मंगळवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आज मंगळवारी जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची स्थिती –
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर महाराष्ट्रासह, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातदेखील पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात 24 रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 25 नंतर पावसाचा जोर कमी होईल आणि 29 पर्यंत ढगाळ वातावरण व मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस जळगाव जिल्ह्यात राहणार आहे.
जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा –
हवामान विभागाने आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 24 (आजपासून) ते 29 सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात पाऊस पडण्याची शकतो. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवादरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच असल्याचा प्राथमिक अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केलाय.
मान्सूनचा आता परतीचा प्रवास –
जळगाव जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस झालाय. तर सप्टेंबर महिन्यात मात्र सरुवातीला पाऊस झाला आणि त्यानंतर गणेशोत्सव काळात व गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांमध्ये झाला. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून परतीच्या वाटेत काही अंशी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview