धडगाव (नंदुरबार), 11 मार्च : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बुगवाडा येथे आज शेवटच्या होळीचा मेलादा उत्साहात संपन्न झाला. सातपुडा परिसरातील वेगवेगळ्या गाव पाड्यातून लोक हा मेलादा पाहण्यासाठी येत असतात. हा मेलादा होळीच्या शेवटच्या दिवशी असतो. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली दिसते.
परंपरेप्रमाणे मेलादा साजरा –
बुगवाडाची होळी आणि मेलादा शेवटी असल्यामुळे मेलादा बघण्यासाठी दूरवरुन लोक याठिकाणी येत असतात. या मेलादामध्ये वेगवेगळ्या दुकानदार येत असतात. गुरखाटल्या मोरखी, बावा, धाणका डोको, नागरामोरखी, आणि वेगवेगळ्या गावातील लोक आदिवासी परंपरा, रीतीरिवाजाप्रमाणे हा मेलादा साजरा करत असतात.
नागरिक आनंद व्यक्त करतात –
या मेलादामध्ये ढोल ताशे, वाजणारे वेगवेगळ्या गावातून येत असतात. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात नाचून आपला आनंद याठिकाणी नागरिक व्यक्त करत असता. तलवार, धाऱ्या, घेऊन याठिकाणी नागरिक नाचून आनंद व्यक्त करतात. त्याच गावातील लोक हातामध्ये छत्री घेऊन ढोल-ताशे, पावी, वाजत मेला गावातील लोक ज्यांना आपण आदीचे गावातील (डाया )असे म्हणत असतो. ते मेला काढतात. त्यात नाच-गात हा मेला काढत असतात.
SPECIAL STORY : शेतकऱ्याच्या पोरीनं नाव कमावलं! नंदुरबारच्या मेघानं मिळवलं विद्यापीठात Gold Medal
दरम्यान, आज हा मेलादा पाहण्यासाठी वेगवेगळ्या गाव पाड्यातून लोक उपस्थित होते. ही होळी शेवटची असते. त्यामुळे मेलादामध्ये पण लोकांची खूप गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर आज बुगवाडा होळीच्या मेलादा उत्साहात संपन्न झाला आणि याचबरोबर होळी उत्सवाचा समारोप झाला.