संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 5 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यानुसार, नागरिक शिक्षण मंडळ संचलित एन.इ.एस. हायस्कूलच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 99.47 टक्के इतका लागला असून यामध्ये नुपूर गोरख सुर्यवंशी हिने 90.67 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलाय. स्नेहा धनराज पाटील (87.50%) द्वितिय तर मृणाली विजय पाटील (86.50 %) हिने तृतीय क्रमांक मिळवलाय.
यासोबतच वेदांत योगेश वाणी (85.83%), कृष्णा हर्षल माने (84.67%), साईराज राहुल मिसर (84.67%) यांनी यश मिळवले आहे. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. वसंतराव मोरे, चेअरमन मिलिंद मिसर, सचिव ए.आर. बागुल व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
बारावीचा विभागनिहाय निकाल –
- कोकण : 96.74 टक्के
- पुणे : 91.32 टक्के
- कोल्हापूर : 93.64 टक्के
- अमरावती : 91.43 टक्के
- छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के
- नाशिक : 91.31 टक्के
- लातूर : 89.46 टक्के
- नागपूर : 90.52 टक्के
- मुंबई : 92.93 टक्के