सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 1 जुलै : भारतात सध्या लागु असलेले ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधान, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा दि. 1 जुलैपासून इतिहासजमा होणार आहे. त्याऐवजी आत्ता भारतीय न्याय संहिता 2023 बीएनएस हा कायदा लागू होणार असुन समाज सुरक्षित ठेवायचा असेल तर नविन कायदयाची अंमलबाजवाणी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पारोळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनिल देवरे यांनी केले.
नवीन कायद्यांविषयी माहिती होण्यासाठी बैठकीचे आयोजन –
देशात आज 1 जुलैपासून नवीन कायदे लागु होणार असल्याने सर्व सामान्य जनतेला या नवीन कायद्यांविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने पारोळा येथील पंचायत समिती हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, गटविकासधिकारी किशोर शिंदे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय ढमाळे आदी उपस्थित होते .
पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे म्हणाले की, नविन कायद्यात अनेक बदल झाले असुन काही कलमे जास्त असताना ते कलमे कमी केले. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलमामध्ये वाढ केली असुन पुरावा म्हणून ऑडिया रेकॉर्डिंग सर्वांत गंभीर असणारे खुनाचे कलम 302 ऐवजी आता 103 असणार आहे. एकूण 511 कलमांची ही न्याय संहिता असणार आहे.
भारतीय दंड संहितेमधील कलम जवळपास तोंडपाठ झालेले आहेत, अशा परिस्थितीत पोलीस ठाणे व न्यायालयीन काम करणाऱ्यांना दैनंदिन कामकाजात नवीन कलमांचा क्रम व त्यातील कायदेशीर तरतुदीही अंमलबजावणी करावी लागणार असल्याचेही वसावे यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी प्रा. संजय भावसार, डॉ. योगेंद्र पवार, डॉ. प्रदीप ओजेकर, प्रा. जी. बी. पाटील, डॉ. राजकुमार जैन, डॉ. सुरेश जैन, मुख्याध्यापिका आशा पाटील, महिला कार्यकर्त्या सुवर्णा पाटील, अॅड. स्वाती शिंदे, ग्रामविस्तारधिकारी सुनिल पाटील, पत्रकार, डॉक्टर, संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुप्त शाखेचे महेश पाटील, पो. कॉ. किशोर भोई आदींसह पारोळा पोलिसांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा : मोठी बातमी! पंकजा मुंडेंसह भाजपकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर