मुंबई, 1 जुलै : भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर केली असून यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाने 5 जणांना उमेदवारी दिली आहे. परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांचा या यादीत समावेश आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी पंकजा समर्थकांकडून करण्यात येत होती. यानंतर भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
कुणाला मिळाली संधी? –
भाजपने विधानपरिषदेसाठी 5 जणांची नावे जाहीर केली असून यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित बोरखे आणि योगेश टिळेकर यांचा समावेश आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम?
- 25 जून – अधिसूचना जारी
- 2 जुलै – अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
- 3 जुलै – अर्ज छाणणी
- 5 जुलै – अर्ज मागे घेण्याची तारीख
- 12 जुलै – मतदान (सकाळी 9 ते दुपारी 4)
- 12 जुलै – मतमोजणी (संध्याकाळी 5 वाजता
हेही वाचा : रणजित निंबाळकर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडेला पोलिसांनी केली अटक, काय आहे संपुर्ण बातमी?