पारोळा : पारोळा तालुक्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू, सुपारीची अवैधरित्या तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक करत घटनास्थळावरुन 65 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल रविवारी करण्यात आली.
काय आहे संपूर्ण घटना –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 एप्रिल रोजी कंटेनर वाहन क्रमांक GJ23Y9373 या वाहनांमध्ये पारोळा जळगाव रस्ता मार्गे अवैधरित्या प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू व सुपारी घेऊन वाहतूक केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पारोळा पोलीस स्टेशन कडील पोलीस स्टाफ व स्थानिक गुन्हे शाखेतील स्टाफ यांना सोबत घेऊन पारोळा – जळगाव रोड वरील रस्त्यांवर जागोजागी पथके नेमण्यात आली.
तसेच पारोळा हद्दीतील हॉटेल राजस्थान महादेव ढाबा या ठिकाणी कंटेनर वाहन क्रमांक GJ23Y9373 हे वाहन पकडण्यात आले. या वाहनात अंदाजे 30,00,000 किमतीची सुगंधी तंबाखू व सुपारी, वरील कंटेनर तसेच त्यातील इतर परचुटन असा अंदाजे एकूण 65,00,000 मुद्देमाल मिळून आला.
यानंतर पोलिसांनी हे वाहन पारोळा पोलीस स्टेशन येथे आणून कंटेनर चालक भरत भाई वीर सिंग भाई वनवा (वय 35, रा. फतेपुरा गुजरात) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही पाहा : ZP School Hol Pachora : 11 लाखांचं बक्षीस जिंकणारी जळगाव जिल्ह्यातील 1 नंबर शाळा | काय आहे खास?