पाचोरा, 22 जून : पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करीत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सध्या पाचोरा, भडगाव तालुक्यात जोमाने वृक्षतोड सुरू आहे. या जंगलतोडीमुळे दिवसंदिवस दिवस जमिनीची धूप होऊन भविष्यात पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. याचा परिणाम सर्वत्र बघण्यास मिळत आहे. दरम्यान, आज सकाळी एक अवैध लाकूड वाहतूक करणारे वाहन निंभोरी येथून भरून जात होते.
याबाबतची माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना मिळाली. यानंतर येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील हे बेकायदेशीर लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर करताना त्यांना दोन व्यक्तींनी धक्काबुक्की केली. सातगाव येथील दीपक परदेशी आणि मुश्ताक शेख या दोघांनी पोलीस निरीक्षक सहायक पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील अटकाव करत धक्काबुक्की केली.
तर या सर्व प्रकारानंतर सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या आदेशाने दोन्ही आरोपींविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गु. र.न. 150/2023 भा. द. वि. 353,332 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी दीपक परदेशी याला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर पाचोरा तालुक्यात आरोपींची मुजोरी वाढत असल्याचे दिसत आहे. जिथे पोलिसांनाच धक्काबुक्की केली जात असेल तिथे सर्वसामान्य नागरिकांचे काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.