जळगाव, 4 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्याला काल हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केल्यानंतर दिवसभरापासून ते रात्रीपर्यंत जिल्ह्यातील काही भागात कुठे जोरदार तर कुठे संततधार पाऊस पडला. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज –
हवामान विभागाकडून महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच ठाणे पालघर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईह उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्याला काल पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस झाला. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी काल रात्रीपासून संततधार पाऊस होत असल्याचे देखील चित्र आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा : Breaking : पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ तिघांचा बुडून मृत्यू, नेमकं काय घडलं?