मुंबई, 17 मे गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात कुठे उन्हाचा पार कायम आहे तर कुठे अवकाळी पाऊस बरसतोय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट कायम असणार असून येत्या 20 मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
असा आहे हवामानाचा अंदाज –
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 20 मेपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. आज महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता असून यामध्ये मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तुरळक ठिकाणी काही तासांसाठी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. असे असताना दिवसभर उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/2mgXloPrBI— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 16, 2024
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता –
राज्यात येणाऱ्या पुढील 24 तासात विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेला इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जळगावसह नाशिक, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. तसेच सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा : “उन्मेश पाटलाच्या डोक्यावर परिणाम झालाय,” एकेरी उल्लेख करत मंत्री गिरीश महाजन यांचा पलटवार