जळगाव, 27 नोव्हेंबर : राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सकाळी व रात्री थंडी वाढली असल्यामुळे अनेक जिल्हे गारठले आहेत. यामध्ये जळगावसह पुणे, नाशिक सातारा, सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात तापमानात कमी झाले आहे. दरम्यान, चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात मोठे बदल होणार असल्याने पुढील दोन ते तीन महिने थंडीचे असणार आहेत.
डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची लाट –
उत्तर भारतात हवामान थंड झाले असल्याने राज्यात देखील थंड वारे वाहत असून तापमानात मोठी घट झाली आहे. यामुळे पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होणार आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन चक्रीवादळाचे रूप धारण करू शकतो, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र (आयमडी) विभागाने दिला आहे. तसेच डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची लाट येणार असल्याचा इशाराही दिला आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पारा घसरला –
सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. जळगावसह मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, , नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात पारा घसरला आहे. पुण्यात तापमानात एक ते दीड अंशांनी कमी झाले असून रात्रीपासून थंड वारे वाहू लागले आहेत. यासोबतच आता दिवसा देखील थंडी जाणवू लागली आहे. यामुळे पहाटेच्या सुमारास तापमानात मोठी घट होत आहे.
जळगावचा पुढील पाच दिवसांचा नेमका अंदाज काय? –
राज्यासह जळगाव जिल्ह्यात पुढील काही दिवस तापमानात घट असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील पुढील पाच दिवसांचे तापमान खालीलप्रमाणे असणार आहे.
27 नोव्हेंबर – कमाल तापमान -30 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 11 अंश सेल्सिअस
28 नोव्हेंबर – कमाल तापमान -30 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 11 अंश सेल्सिअस
29 नोव्हेंबर – कमाल तापमान – 29 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 13 अंश सेल्सिअस
30 नोव्हेंबर – कमाल तापमान – 29 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 14 अंश सेल्सिअस
1 डिसेंबर – कमाल तापमान – 29 अंश सेल्सिअस | किमान तापमान – 14 अंश सेल्सिअस
हेही पाहा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..