• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 18, 2026
in ताज्या बातम्या
धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

नागपूर, 18 जून: श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे १८ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत पीएच.डी. संशोधकांसाठी १० दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र (Research Methodology) अभ्यासक्रमाचे  उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या PM-USHA 3.0 – Grants to Strengthen Colleges उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला आहे.

धनवटे नॅशनल कॉलेजच्या Place for Higher Learning and Research (PHLR) व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अध्ययन विद्याशाखेअंतर्गत ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उदघाटन कार्यक्रमात डॉ. अखिलेश पेशवे, प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे उदघाटक म्हणून लाभले असून डॉ. मंगला हिरवाडे, प्रभारी अधिष्ठाता, आंतरविद्या-शाखा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. प्रशांत कोठे, प्राचार्य, धनवटे नॅशनल कॉलेज, डॉ. वैशाली डी. मालोदे, आयक्यूएसी समन्वयक, डॉ. के. डी. मेघे, पीएम-उषा समन्वयक आणि डॉ. राजेश तिमाने,पीएम-उषा नोडल ऑफिसर मंचावर उपस्थित होते.

उद्घाटन समारंभाची सुरुवात डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन, विद्यापीठ गीत आणि भाऊसाहेब गीत सादर करण्यात आले.

प्रास्ताविक करतांना डॉ. के. डी. मेघे, पीएम-उषा समन्वयक यांनी संशोधन पद्धतीशास्त्राचे शैक्षणिक उत्कृष्टता आणि गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या संशोधन क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत संशोधकांना या कार्यशाळेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.

डॉ. मंगला हिरवाडे, प्रभारी अधिष्ठाता, आंतरविद्या-शाखा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आंतरविद्याशाखीय संशोधनाचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. तसेच समकालीन सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी संशोधनाची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अखिलेश पेशवे, प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या हस्ते झाले. त्यांनी संशोधकांना नाविन्यपूर्ण, समाजोपयोगी आणि परिणामकारक संशोधन करण्याचे आवाहन केले. तसेच या १० दिवसीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन त्यातून शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध अनुभव प्राप्त करण्याचे आवाहन केले.

डॉ. प्रशांत कोठे, प्राचार्य, धनवटे नॅशनल कॉलेज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संशोधन संस्कृतीच्या वृद्धीसाठी महाविद्यालयाच्या कटिबद्धता पुनरुच्चार केला. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे संशोधन आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील योगदान विशेषत्वाने अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्यामल रुईकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. वैशाली डी. मालोदे, आयक्यूएसी समन्वयक यांनी केले. संशोधन पद्धतीशास्त्र विषयावरील पीएच.डी. पूर्व अभ्यासक्रमाला संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, या कार्यक्रमासाठी एकूण ६२ संशोधकांनी यशस्वी नोंदणी केली.

उद्घाटन सत्रानंतर शैक्षणिक सत्रांना सुरुवात झाली. पहिल्या सत्रात डॉ. श्यामल रुईकर यांनी “संशोधनाचा आढावा” या विषयावर मार्गदर्शन केले. दुसरे सत्र “संशोधनाची संकल्पना (शीर्षक निर्मिती इत्यादी)” या विषयावर डॉ. अनुप सुचक यांनी घेतले. तिसऱ्या सत्रात डॉ. आशीष लिंगे यांनी “उद्दिष्टे आणि गृहितके मांडणी” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

या अभ्यासक्रमात विविध शाखेतील संशोधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संशोधन आराखडा, संशोधन पद्धती, माहिती विश्लेषण, शैक्षणिक लेखन आणि प्रकाशन नीतिमत्ता यांविषयी सखोल ज्ञान देऊन उच्च शिक्षणातील संशोधनाची गुणवत्ता उंचावणे हा या अभ्यासक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

अभ्यासक्रम संशोधन क्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण पैलूंना समर्पित असून त्यामध्ये संशोधन संकल्पना, संशोधन विषय निवड व शीर्षक निर्मिती, उद्दिष्टे व गृहितक मांडणी, गुणात्मक व परिमाणात्मक संशोधन पद्धती, संशोधन नैतिकता व शैक्षणिक प्रामाणिकता, संशोधन प्रस्ताव लेखन, माहिती संकलन तंत्रे, सांख्यिकीय विश्लेषण, SPSS व R सॉफ्टवेअरचा वापर, संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा उपयोग, साहित्य समीक्षा लेखन, ई-संसाधनांचा प्रभावी वापर, शोधनिबंध व प्रबंध लेखन, संदर्भ व्यवस्थापन साधने (Zotero, Mendeley), संशोधनादरम्यान तणाव व्यवस्थापन तसेच डेटा विश्लेषण व अर्थनिर्णयन यांसारख्या विषयांचा समावेश आहे. अभ्यासक्रमादरम्यान दररोज अभिप्राय व मूल्यमापन परीक्षा आयोजित करण्यात येणार असून ३० जून रोजी अंतिम परीक्षा व समारोप सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या  अभ्यासक्रमात   डॉ. श्यामल रुईकर, डॉ. मंगला हिरवाडे, डॉ. राजेश तिमाने, डॉ. अनुप सुचक, डॉ. आशिष लिंगे, डॉ. प्रविण घोसेकर, डॉ. रेखा शर्मा, डॉ. गायत्री बंड, डॉ. वैशाली गुढधे, डॉ. शालिनी लहितकर, डॉ. पूजा दाढे, डॉ. प्रियंका वांढे आदी तज्ज्ञ मार्गदर्शक संशोधन विषयक विविध पैलूंवर मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा: राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: nagpur newsPre-Ph.D. Research Methodology CourseResearchers at Dhanwate National Collegesuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

June 18, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

June 18, 2026
अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page