इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा : स्वप्नांचा पाठलाग करणं थांबवू नका. स्वप्नांचा पाठलाग करताना कष्ट जिद्द, मेहनत, चिकाटी आवश्यक आहे. प्लॅन ए वर्क होत नसेल तर प्लॅन बी रेडी ठेवा. निराश होऊ नका. आयुष्याला आनंदाने सामोरे जा. पुस्तकांशी मैत्री करा, असा मौलिक सल्ला मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून कार्यरत असलेल्या आणि पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी अॅड. वसुंधरा राठोड यांनी दिला.
पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथे कनिष्ठ महाविद्यालयांतर्गत वक्तृत्व व वादविवाद मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. काल 20 ऑगस्ट 2024 रोजी काल हा कार्यक्रम पार पडला. मंडळाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून कार्यरत असलेली महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी अॅड. वसुंधरा राठोड यांना आमंत्रित करण्यात आले होते. या मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी कु. वसुंधरा राठोड यांनी विद्यार्थ्यांना उत्तम वक्तृत्व करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, याविषयी मार्गदर्शन केले.
प्लॅन ए वर्क होत नसेल तर…
स्वप्नांचा पाठलाग करणं थांबवू नका. स्वप्नांचा पाठलाग करताना कष्ट जिद्द, मेहनत, चिकाटी आवश्यक आहे. प्लॅन ए वर्क होत नसेल तर प्लॅन बी रेडी ठेवा. निराश होऊ नका. आयुष्याला आनंदाने सामोरे जा. पुस्तकांशी मैत्री करा, असा मौलिक सल्ला दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एस. एस. पाटील यांनी भूषविले. तर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. बी.पाटील, प्रा. डॉ.जे पी बडगुजर, प्रा. नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वक्तृत्व व वादविवाद मंडळाच्या प्रमुख प्रा. डॉ. सुनिता गुंजाळ यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. जे. पी. बडगुजर यांनी केले . याप्रसंगी प्रा. मनीषा माळी, प्रा. एम के पाटील, प्रा. विजया देसले, प्रा. वासंती चव्हाण, प्रा. प्रदीप देसले, प्रा. महेंद्र महाजन, प्रा. गौरव चौधरी व इतर प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.