• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

MUHS Nashik : मोबाईलचा वाढता वापर सर्वांनाच घातक – बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 11, 2023
in महाराष्ट्र, Uncategorized
विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर आणि कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर

विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर आणि कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर

नाशिक, 11 मार्च : वाढता स्क्रीन सर्वांनाच धोकेदायक आहे, असे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर समवेत पुणे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्राध्यापिका, बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या.
तसेच या कार्यक्रमास व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, मतनिसच्या अध्यक्षा योगिता पाटील, सचिव शिल्पा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाईलचा वाढता वापर सर्वांनाच घातक –

याप्रसंगी समृध्द पालकत्व विषयावर मार्गदर्शन करतांना डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या प्राध्यापिका आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर यांनी सांगितले की, महिलांनी कुटुंबाची काळजी घेतांना मुलांवर अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. सध्या मोबाईलचा वाढता वापर सर्वांनाच घातक ठरणारा आहे. विशेषतः लहान मुलांच्या बुध्दिमत्तेवर आणि मानसिकतेवर घातक परिणाम करत आहे. याकरीता सर्वांनी स्क्रीन टाईम कमी करणे आवश्यक आहे. विशेषतः पालकांनी याबाबत अधिक जागरुक राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या की, मुलांना संतुलित आहार गरजेचा असून त्यासाठी रोजच्या स्वयंपाकात विविध जीवनसत्त्व, प्रथिन व कार्बोहाड्रेटस् असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. पॅकिंग फुट खाणे शक्य झाल्यास टाळावे. तरुण वयात येणाऱ्या मुलांची आणि मुलींची मानसिकता पालकांनी ओळखणे गरजचे आहे. या वयात वाईट व्यसनं लागण्याची शक्यता अधिक असते. यासाठी मुलांसमवेत दररोज काही वेळ घालवावा अन्य विषयांवर चर्चा करावी. सामाजिक बांधिलकी, आज्ञाधारपणा व वक्तशीरपणा यांचे रोपण करावे तर पुढील पिढी वरिष्ठांचा आदर करेल. यासाठी घरातील महिलानांनी अधिक सजग आणि दक्ष राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

…..तरच महिला सक्षम होतील – कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर

दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, समाजाला पुढे नेण्यासाठी स्त्री शिक्षणाबरोबर त्यांचा सन्मान झाला पाहिजे. ’संशोधन तंत्रज्ञान याचा उपयोग लिंगभाव समानतेसाठी’ असा या वर्षाच्या जागतिक महिला दिनाची थीम आहे. या अनुषंगाने महिलांनी टेक्नॉलॉजी अणि ऑनलाईन क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच महिला आर्थिक, वैचारीकरित्या स्वावलंबी आणि सक्षम होण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी महिलांच्या उपक्रमांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. यासाठी स्त्री-पुरुष समानता जोपासण्यात यावी. महिलांनी सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. समाजातील महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित आहे. योग्य वर्तन आणि ज्ञानसमृध्द होण्यासाठी वाचन आणि क्रीडा संस्कृती जोपासली पाहिजे तरच महिलांसह समाज सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्राबरोबर अवकाश संशोधन, तंत्रज्ञान, औषध, कला व उद्योग आदी क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे. आपल्या संस्कृतीत महिला आणि मातांचा आदर करण्यात येतो. महिलांचे कर्तृत्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. महिला प्रत्येक कामात निपुण असतात. आपल्या कुटुंबापासूनच सर्वांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवण मुलांना आणि विद्यार्थ्यांना द्यावी तरच प्रेरणादायी समाज निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, थोर स्त्रियांचे विचार, चरित्र कायम स्मरणात ठेवा व त्यानुसार वागा.  वाचन, लेखन आदी छंद जोपासून नेहमी आनंदी रहा. कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी आपल्या कामाचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे, असा चांगला ठसा उमटवा, असे त्यांनी सांगितले.

तर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी एन.व्ही.कळसकर यांनी सांगितले की, समाजातील मुली आणि महिलांचा सन्मान प्रत्येकाने करावा. महिला दिन साजरा करण्याची ही संकल्पना चूकीची नाही. मात्र, दररोज त्यांचा सन्मान झाल्यास महिला दिन नावाने वेगळा दिवसही साजरा करण्याची गरज भासणार नाही. समाजातील मुली शिक्षित आणि सुरक्षित राहणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी महिला दिनाच्या प्रतिज्ञेने वाचन केले आणि उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मतनिसच्या अध्यक्षा श्रीमती योगिता पाटील यांनी केले. प्रमुख व्याख्यात्या यांचा परिचय श्रीमती रंजिता देशमुख यांनी करुन दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा पवार यांनी तसेच उज्वला साळुंखे यांनी आभार मानले.

विद्यापीठात रांगोळी स्पर्धा व मॉकटेल स्पर्धेचे आयोजन –

महिला दिनानिमित्त विद्यापीठात रांगोळी स्पर्धा व मॉकटेल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेत आशा वाबळे यांनी प्रथम व शितल शिंदे यांना व्दितीय आाणि ज्योती इटणकर यांनी उपविजेता म्हणून बक्षिस मिळविले. मॉकटेल स्पर्धेत विविध पदार्थापासून हेल्थी ज्यूस तयार करण्यात आले होते. यास्पर्धेत कांचन सानप यांनी प्रथम ज्योती कर्नाटकम यांनी व्दितीय आणि लीना आहिरे यांनी उपविजेता म्हणून बक्षिस मिळाले. शोभना भिडे, शिल्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आले. याकरीता रंजिता देशमुख, प्रविण घाटेकर, सुरेश शिंदे, उज्वला साळुंखे, शैलजा देसाई यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: dr madhuri kanitkarinternational womens day muhsinternational womens day nashikmadhuri kanitkarmadhuri kanitkar muhsmuhs latest newsmuhs nashikmuhs newsnashik muhs news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | Pachora News : बहुळा धरणातून पहिले आवर्तन सुटले; शेतकऱ्यांना रब्‍बी हंगामात होणार मोठा लाभ

Video | Pachora News : बहुळा धरणातून पहिले आवर्तन सुटले; शेतकऱ्यांना रब्‍बी हंगामात होणार मोठा लाभ

January 17, 2026
जीआय-टॅग उत्पादनांमुळे गोव्याचा पारंपरिक वारसा संरक्षित – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

जीआय-टॅग उत्पादनांमुळे गोव्याचा पारंपरिक वारसा संरक्षित – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

January 17, 2026
खान्देशातील जळगाव-धुळे महानगरपालिकेत ‘भाजपचं टॉप’; ‘असा’ आहे निवडणुकीचा संपुर्ण निकाल

खान्देशातील जळगाव-धुळे महानगरपालिकेत ‘भाजपचं टॉप’; ‘असा’ आहे निवडणुकीचा संपुर्ण निकाल

January 17, 2026
LIVE: Municipal Corporation Election 2026 Results: Who has won in Jalgaon so far? Live results

LIVE : महानगरपालिका निवडणूक 2026 निकाल : जळगावात महायुतीचा ऐतिहासिक विजय, महाविकास आघाडीचा पुन्हा धुव्वा, कुणी किती जागा जिंकल्या, लाईव्ह निकाल

January 16, 2026
राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

January 16, 2026
जिल्हा युवा पुरस्कारासाठी ‘या’ तारखेपर्यंत जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा युवा पुरस्कारासाठी ‘या’ तारखेपर्यंत जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

January 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page