पाचोरा, 22 जून : भारतच नव्हे तर जगात 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यातही श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
पाचोरा येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात काल 21 जून 2023 रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिवस मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्य साधून पाचोरा न्यायालयाचे प्रथम न्यायदंडाधिकारी जी. बी. औंधकर, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी योगाचे महत्त्व विशद करत आपले विचार मांडले.
या योग दिनाच्या कार्यक्रमात बीज मंत्रासह सूर्यनमस्कार, त्यासोबतच शयन स्थिती, विपरीत शयन स्थिती, बैठक स्थिती आणि दंड स्थितीतील निवडक आसनांचा अभ्यास करण्यात आला. प्राणायामानंतर प्रार्थनेने योगवर्गाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयात कार्यरत प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी योगशिक्षक म्हणून प्रात्यक्षिके दाखवली.
या मान्यवरांची होती उपस्थिती –
तसेच या कार्यक्रमासाठी पाचोरा न्यायालयातील न्यायाधीश श्रीमती एम. जी. हिवराळे, न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी, पाचोरा विधी संघाचे सर्व पदाधिकारी, बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष ॲड. मंगेश गायकवाड, सचिव ॲड. राजेंद्र पाटील, ॲड. सुरेश माहेश्वरी, ॲड. एस. पी. पाटील, डी. आर पाटील, बार कौन्सिलचे सदस्य वकील बंधू-भगिनी, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, दीपक पाटील, त्यासोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. एस. एस. पाटील, वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आर. बी. वळवी, पाचोरा तालुका क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील, प्रा. डॉ. श्रावण तडवी, प्रा. स्वप्निल भोसले, शांताराम चौधरी, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, ग्रंथालय विभाग तथा शिक्षकेतर कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.