• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon Tourist in Ayodhya : जिल्हा प्रशासनाची मदत, अयोध्येहून परतणारे ते भाविक जळगावात सुखरूप दाखल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 8, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Jalgaon Tourist in Ayodhya: District administration's help, devotees returning from Ayodhya reach Jalgaon safely

Jalgaon Tourist in Ayodhya : जिल्हा प्रशासनाची मदत, अयोध्येहून परतणारे ते भाविक जळगावात सुखरूप दाखल

जळगाव, 8 डिसेंबर : अयोध्या–प्रयागराज महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या जळगाव, धुळे जिल्ह्यातील भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले होते. या सर्व सुरक्षित भाविकांना स्वतंत्र रिझर्वेशन बोगीद्वारे परतीचा प्रवास उपलब्ध करून देण्यात आला. आज सर्व भाविक लखनऊ ते एल टी टी, गाडी क्रमांक 01016 द्वारे जळगाव रेल्वे स्थानकावर सुखरूप दाखल झाले. यावेळी सर्व भाविकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तत्काळ मदतीच्या सूचनांनुसार हे मदतकार्य युद्धपातळीवर आणि जलदगतीने पूर्ण करण्यात आले. जिल्हा प्रशासन, सुलतानपूर प्रशासन, लखनऊ व भुसावळ रेल्वे विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या समन्वयातून भाविकांसाठी निवास, भोजन, उपचार आणि सुरक्षित परतीची सर्व व्यवस्था करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी संपूर्ण मदतकार्य यशस्वी केले. दरम्यान, अपघातात पिंप्राळा (जळगाव) येथील छोटीबाई शरद पाटील (५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे जळगावला तात्काळ आणण्याची व्यवस्था करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

एकूण परत आलेल्या 43 भाविकांमध्ये दोन धुळे, एक नाशिक, एक पुणे येथील असून उर्वरित सर्व धरणगाव, एरंडोल, पाचोरा, भुसावळ, यावल, पारोळा आणि वरणगाव या जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणांतील आहेत.

जळगाव स्टेशनवर पोहोचताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी सर्व भाविकांचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार धरणगाव महेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच भाविकांचे नातेवाईक उपस्थित होते.

प्रशासन सर्व भाविकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत त्यांच्या संपर्कात आहेत. सर्व भाविक आज सायंकाळी 6.30 वाजता जळगावात सुखरूप दाखल झाले. भाविकांनी प्रशासनाने केलेल्या जलद मदत कार्य व प्रतिसादाबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. रेल्वे स्टेशन वरून सर्व भाविक आपल्या नातेवाईकांसमवेत निवासस्थानाकडे रवाना झाले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayodhyajalgaonrohan ghugetourist

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

February 18, 2026
Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

February 18, 2026
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

February 18, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

February 18, 2026
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

February 18, 2026
आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

February 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page