मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 16 मार्च : चोपडा तालुक्यातील लासुर येथील जवान विनोद विठ्ठल मगरे यांची भारतीय सैन्य दलात 22 वर्ष सेवा पुर्ण झाली असून ते सेवानिवृत्त झाले. दरम्यान, सेवानिवृत्तनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणेंच्या विनोद मगरे यांचे स्वागत करण्यात आले.
विनोद मगरे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त –
विनोद मगरे यांनी भारतीय सैन्य दलात 22 वर्ष प्रदीर्घ काळ उत्कृष्ट सेवा बजावली आणि ते सेवानिवृत्त झाले. यानिमित्त गावात मिरवणूक काढून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार प्रा चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विनोद विठ्ठल मगरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.
एका सैनिकाची ड्यूटी म्हणजे आयुष्यातील खडतर प्रवास असतो. आपल्या घरातील सदस्यांपासून दूर ते देशाची सेवा जवानांकडून केली जाते. म्हणून, प्रदीर्घ काळ देशाची सेवा बजावून समाजाची सेवा करण्यासाठी विनोद मगरे परत आले आहेत, अशा शब्दात आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए. के. गंभीर हे होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र महाजन यांनी केले. यासोबतच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप माळी यांनी केले तर हा कार्यक्रमाचे नियोजन लासूर येथील साई गृप यांनी केले.
याप्रसंगी सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक गोपाल पाटील, सुभेदार इंडियन आर्मी अजय मेहला, देवलाल बाविस्कर, कैलास बाविस्कर, ॲड कुंदन साळूंखे माजी सैनिक जयवंत पंडित पाटील, सुनील माळी, विठ्ठल धनगर, देवाजी माळी, राकेश अहिरे, नितीन देवरे, महेंद्र मराठे, संजय महाजन, किशोर चौधरी, राहुल पाटील, वासुदेव महाजन, किशोर माळी, सुरेश माळी, सुरेश पवार, अजय पालीवाल, तसेच विनोद मगरे यांचे वडील विठ्ठल राजाराम मगरे, आई सरला विठ्ठल मगरे, त्यांची पत्नी वर्षा विनोद मगरे व त्यांचे बंधू नातेवाईक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.