ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 19 डिसेंबर : युवासेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, जितेंद्र जैन यांची श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, अबूलैस शेख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
नियुक्तीपत्रात काय म्हटलंय? –
जितेंद्र जैन यांची श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीपत्रात म्हटल्याप्रमाणे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल.
दरम्यान, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.






