ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 17 जानेवारी : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापना येत्या 22 जानेवारी रोजी करण्यात येत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून ठिकठिकाणी मंदिरांना रंगोटी, लायटिंग, पताके, सजावट, कलश यात्रा, कीर्तन यासांरख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे
मद्य विक्री व मांस विक्री दुकाने बंद ठेवावी –
प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्त 22 जानेवारी रोजी घरोघरी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दरम्यान, त्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहर भाजपच्यावतीने पाचोरा शहरातील सर्व मद्य विक्री दुकाने,बार आणि मांसविक्री करणारे सर्व दुकाने 22 जानेवारी 2024 सोमवार रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाजपच्यावतीने निवदेन –
भाजपा शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या आशयाचे निवेदन आज पाचोरा नगरपरिषद व पाचोरा पोलीस स्टेशन यांना देण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष दिपक माने, जगदीश पाटील, समाधान मुळे, विष्णू अहिरे, स्वप्नील सोनार, योगेश ठाकूर, राहूल गायकवाड, विरेंद्र चौधरी, प्रदिप पाटील, मनीष भावसार, सोहन मोरे, गोकुळ दारकुंडे, आशिष जाधव, अमोल वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : प्रांताधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ल्याप्रकरणी पाचोऱ्यातून तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक