ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 एप्रिल : संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश व शिकवण देणारे भगवान महावीर यांची जयंती आज पाचोरा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभागी होऊन आशीर्वाद घेतला.
भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून आज पाचोरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात जैन पाठशाला येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या सहकार्यांसह यात सहभाग घेतला.
प्रारंभी जैन पाठशालेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
हेही वाचा : पारोळा येथे जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात मिरवणुकीत सर्वधर्मीयांकडून मंगल आरती