संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 21 एप्रिल : विश्वाला जगा व जगू द्याचे संदेश देणारे अहिंसेचे महानपुजारी जैन धर्मीयाचे 24 वे अंतीम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा आज 21 एप्रिल रविवार रोजी 2623 वा जन्मकल्याणक महामहोत्सव दिनानिमित्त शहराच्या प्रमुख भव्य मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी सर्वधामियांकडून मंगल आरती ओवाळून स्वागत केले. काही भक्त गण आपल्या दारातूनच भगवान महावीर स्वामींना वंदन करून आपली भावना व्यक्त करीत होते. मिरवणुक मार्गक्रमण करित असता. अधून मधून भक्तगण भगवान महावीर स्वामींचा तसेच आचार्य विद्यासागरजी मुनिश्रीचा आणि गौरव असलेले तपस्वीवृन्दांचा जयघोषाने नगरी गजबजली होती.
जैन ट्रस्टी, जैन नवयुवक, जैन महिला मंडळ, समाज बांधव व भागीनी यांच्या सहकार्याने मंगलमय वातावरणात विविध धार्मिक संपन्न झाले. मिरवणुकीची शोभायात्रेची सांगता दिगंबर जैन वाडीमध्ये करण्यात आली .