मुंबई, 19 जानेवारी : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी पार पडली असताना महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागलंय. अशातच आता29 महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत तारीख ठरली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी महानगरपालिकेतील महापौरपदाचे आरक्षण सोडत पार पडणार आहे.
22 रोजी महापौर पदाची आरक्षण सोडत –
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यामध्ये राज्यात महायुतीला मोठं यश मिळाल्याचे दिसून आलंय. दरम्यान, आता महापालिकेमधील महपौरपदाच्या आरक्षण सोडतीची तारीख निश्चित करण्यात आली असून येत्या 22 जानेवारी रोजी मंत्रालयात सकाळी 11 वाजता महापौर पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नगरविकास विभागाच्यावतीने याबाबतचे पत्र जारी करण्यात आले आहे.
महापालिकेतील महापौर पदाचे आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष –
राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक पार पडल्यानंतर आता महापौर पदांचे भवितव्य या आरक्षण सोडतीवर अवलंबून असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परदेश दौऱ्याच्या काळातच ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याने राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण काय निघणार आणि त्यानंतर महायुतीतील रस्सीखेच कशी थांबणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Jalgaon Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जळगाव जिल्हा परिषदेच्या 4 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई






