जळगाव, 9 सप्टेंबर : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे आज 9 सप्टेंबर व 10 सप्टेंबर असे दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते त्यांचा दौरा खालील प्रमाणे आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटणार आहेत.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन जळगाव जिल्हा दौऱ्यावर –
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या नियुक्तीनंतर दोन दिवसाच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून ते या दौऱ्यात ते जिल्ह्यातील शिक्षण, सामाजिक, राजकीय, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
राज्यपालांच्या दौऱ्याचे असे आहे नियोजन –
- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज संध्याकाळी 5. 15 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन
- संध्याकाळी 5.35 वाजता “अजिंठा” शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन
- संध्याकाळी 5.35 ते 5.45 राखीव, संध्याकाळी 5.45 ते 7 पर्यंत “अजिंठा” शासकीय विश्रामगृह जळगाव येथे संवाद भेटीसाठी राखीव
- संध्याकाळी 7 ते 7.45 पर्यंत जेवणासाठी राखीव रात्री अजिंठा विश्रामगृह येथे मुक्काम
- उद्या, मंगळवार 10 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 ते 9.30 राखीव
- सकाळी 9.30 ते 10.15 “अजिंठा” येथे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी संवाद
- सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 राखीव
- दुपारी 1.30 ते दुपारी 2.30 जेवणासाठी राखीव
- दुपारी 2.30 वाजता जळगाव विमानतळाकडे प्रयाण
- दुपारी 2.45 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन
- दुपारी 2.45 ते दुपारी 2.50 पर्यंत जळगाव विमानतळ येथे राखीव
- दुपारी 2.50. ला जळगाव विमानतळावरून प्रयाण
हेही वाचा : Video : ओळख प्रशासनाची; प्रांताधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या काय, त्यांचं कामकाज कसं चालतं?