मुंबई, 15 जुलै : मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, भुजबळ आज सोमवारी सकाळी अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, या भेटीवर मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ठीकरण दिले आहे.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? –
मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, ही कोणतीही राजकीय भेट नव्हती. म्हणून कोणताही राजकीय अर्थ काढू नका. ओबीसी मुद्यावर मार्ग कसा काढायचा?, याबाबत चर्चा केली. राज्यामध्ये ओबीसी आरक्षण देण्याचे काम पवारांनी केले. आता आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. त्या संदर्भात मी त्यांना आठवण करून दिली. तसेच मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यावेळी जो पुढाकार घेतला होता, याची सुद्धा त्यांना आठवण करून दिली.
छगन भुजबळ यांनी उपोषणकर्त्यांना सरकारकडून काय माहिती देण्यात आली, याबाबत पवारांना माहिती दिली. शरद पवारांच्या प्रतिप्रश्नाला उत्तर देताना भुजबळांनी सांगितले की, त्यावेळी आम्ही आंदोलकांना आश्वासन दिले की सरकारी योग्य पद्धतीने यावरती मार्ग शोधेल. मी त्यांना विनंती केली की, तुम्ही राज्याचा चांगला अभ्यास आहे. आम्ही मंत्री-मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळाच अभ्यास आहे, असे समजायचे कारण नाही. म्हणून तुम्ही राज्यातील जेष्ठ नेते आहात, म्हणून तुम्ही यामध्ये स्वतः लक्ष घाला, असे भुजबळ यांनी शरद पवार यांना सांगितले.
शरद पवार काय म्हणाले? –
भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार म्हणाले की, मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बोलतो आणि त्यानंतर हा विषय कसा सोडवायचा याबाबत मार्ग काढतो. ओबीसी विषय सुटावा हाच आमचा विषय आहे. दरम्यान, मी या विषयाबाबत कुणालाही भेटायला तयार आहे. गोरगरीबांची घरे पेटता कामा नये म्हणून पंतप्रधान असो की राहुल गांधी कुणालाही भेटायला तयार असल्याचे देखील भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा : Pooja Khedekar: पूजा खेडकर प्रकरणात विद्यार्थ्यांवर अन्याय, कारवाई करावीच लागेल – विजय कुंभार