जळगाव, 16 मे : भारत-पाक यांच्यात शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लष्काराचे कौतुक केले. मात्र, राजकीय नेतृत्वावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी राऊतांनी केली होती. दरम्यान, राज्याचे जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मंत्री गिरीश महाजन यांन आज पत्रकारांनी संजय राऊतांच्या टीकेबाबत प्रश्न विचारला. युद्ध सुरू असताना संपुर्ण देश पंतप्रधान मोदी तसेच सेनेच्या पाठीशा होता. अशावेळी राऊत म्हणतात की, नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी राजीनामा द्यावा. मला वाटतं की, आपण आता त्या अतिरेक्यांशी लढावं की देशांतर्गत अतिरेक्यांशी लढाव, हाही मोठा प्रश्न असल्याचे असे मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
राऊतांच्या पुस्तकाला फारसं महत्व देण्याची गरज नाही –
खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना याबाबतचा प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांना विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, मला वाटतं की, त्यांच्या पुस्तकाला किती महत्वा द्यावं संजय राऊत किती विश्वासहार्य माणूस हे सर्वांना माहितीये. त्यामुळे त्यांनी काय लिहिलं हे मी वाचलं नाही आणि वाचणारही नाही. दरम्यान, राऊतांच्या पुस्तकाला फारसं महत्व देण्याचं गरज नसल्याचे मंत्री महाजन म्हणाले.
काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आणि आपल्या विचारांना तिलांजली दिलेल्या शिवसेनेसोबत आम्ही नसून आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत. तसेच विचारांना तिलांजली दिल्यानंतर त्यांची आज काय परिस्थिती झाली. त्यामुळे रोज सकाळी बडबड त्यांना करावी, लागते, अशा खोचक शब्दातही मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांचा समाचार घेतलाय.