• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा 31 कोटी रुपये किमतीचा साठा जप्त; मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 6, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा 31 कोटी रुपये किमतीचा साठा जप्त; मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

मुंबई, 5 जानेवारी : राज्यभर प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादनाविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असून २ जानेवारी २०२६ रोजी ३१.६७ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यात प्रतिबंधित पदार्थांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून त्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी आढावा घेतला.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील ‘मे. सोएक्स इंडिया प्रा. लि.’ कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुन्यांमध्ये अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार ‘निकोटिन’ पॉझिटिव्ह आढळल्याने शासनाने १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाले आहे. हे उत्पादन मानवी आरोग्यास घातक असून उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्स, कच्चे पदार्थ आणि फ्लेवर्सचा ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपयांचा साठा जप्त करून कंपनी सील करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३(५), १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या विविध कलमांनुसार (कलम ३०, २६, २७, ५९) नुसार आरोपींविरुद्ध अनिल कुमार चौहान, असिफ फाजलानी, फैजल फाजलानी, मे. सोएक्स इंडिया प्रा. ली. विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला. १ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या ‘अफजल’ ब्रँडच्या हुक्का नमुन्यांच्या तपासणी अहवालात निकोटिनचे प्रमाण आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.


शासनाने मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या सुगंधी तंबाखू आणि हुक्क्यावर बंदी घातली असल्याने ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील दापोडे परिसरातून १९ कोटी ४५ लाख ७६ हजार ३२० रुपये किमतीचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला आहे. यात मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी’ या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने ३० डिसेंबर २०२५ रोजी छापा टाकत त्याचा मोठा साठा जप्त केला होता.

“राज्यात बंदी असलेल्या सुंगधित तंबाखू आणि हुक्का उत्पादन करत कायद्याचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल”, असा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

हेही वाचा : गोवा शिपयार्डमध्ये घडविलेल्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कार्यान्वयन

बातमी शेअर करा !
Share
Tags: banned hookahFood and Drug Administrationmarathi newsnarhari zirwalsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

March 7, 2026
VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

March 6, 2026
आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

March 6, 2026
‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

March 6, 2026
Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

March 5, 2026
VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

March 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page