मिलिंद वाणी, प्रतिनिधी
भडगाव, 15 एप्रिल : आज तरुण कार्यकर्ते एवढा मोठा वधु वर परिचय मेळावा ठेवून माणसं जोडण्याचं फार मोठं काम करीत आहेत. या त्यांच्या समाज कार्यास आद्यकवी महर्षी वाल्मिकी महाराजांच्या आशीर्वाद लाभून जास्त जास्त वधू वर जोडप्यांनी एकत्रित सहभाग नोंदवावा. तसेच कार्यक्रम हा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांना फायदेशीर कसा होईल याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रीत करावे असे सांगत प्रत्येक समाजात वधू वर मेळावा घेण्याची नितांत गरज असल्याचे मत आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केले. ते भडगाव येथील खान्देश विभागीय कोळी वधू, वर परिचय मेळावा कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चाळीसगाव पं.स. माजी सभापती बाबुलाल मोरे,व प्रमुख पाहुणे म्हणून चोपड्याचे आमदार प्रा .चंद्रकांत अण्णा सोनवणे, पाचोरा भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील यांची खास उपस्थित लाभली होती. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मेळाव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी बाबुल तात्या मोरे ,दिलीप सोनवणे, अनिल सावळे ,सुनील मोरे ,राहुल कोळी ,संजय कोळी, योगेश कोळी ,अनिकेत कोळी, तुकाराम मोरे रघुनाथ खलाणे, राकेश चित्ते, मछिंद्र कोळी, दीपक काकडे, आकाश सोनवणे उत्राण, पंडित जोहरे जामनेर, जळगांव चे ऍड गणेश सोनवणे, बाळा सोनवणे, अनिल सोनवणे, पाचोरा दशरथ जाधव, संभाजी शेवरे, तुकाराम कोळी, किशोर रायसाकडा, राजेंद्र खैरनार, बाबा फिटर, जगदीश शेवरे, समाधान कोळी, अजय कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालनप्रा.अशोक तायडे यांनी तर
आभार योगेश सोनवणे यांनी मानले.
वधू-वर मेळाव्याचे आयोजक अनिल सावळे, गिरड सुनील मोरे, दिलीप सोनवणे, संजय कोळी हे होते. यावेळी जिल्ह्याभरातील कोळी समाज बांधवांसह वधू वर पालकांची यावेळेला उपस्थिती लाभली होती. वधू वर व त्यांच्या पालकांनी यावेळी मेळाव्यात परिचय दिला, तसेच उपस्थित मान्यवर व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला, तर समाज बांधवां तर्फे आयोजकांचा सत्कार करण्यात आला,
वधू-वर यांबाबत अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.
हेही वाचा : सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत; सन 2025-2030 साठी तारखा जाहीर; पाचोरा-भडगावची तारीख कधी?