पुणे, 18 जानेवारी : राष्ट्रवादी-शिवसेना या दोन्ही पक्षात दोन गट पडल्यानंतर त्यांच्यात जोरदार संघर्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले रोहित पवार? –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला लोकनेते आवडत नाहीत. भाजपने अनेक लोकांची ताकद कमी केली असून त्यांच्याच नेत्यांची ताकद कमी केली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल हे लिहून ठेवा. ते बारामती येथे बोलत होते.
कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शन –
आमदार रोहित पवार यांनी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शनाची पाहणी केली. 18 ते 22 दरम्यान कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शन होणार आहे. या कृषी प्रदर्शनाला राज्यभरातून लोक येत असतात. ज्या प्रमाणे शेतकरी येत असतात त्याचप्रमाणे राजकिय नेते देखील येत असतात. आज रोहित पवारांनी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांना इथे नवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत. उत्पन्न दुप्पट करायचा प्रयोग इथे होत आहे. पाण्याचे व्यवस्थापन करायचे, असे झाले तर दुष्काळातून बाहेर पडू शकतो, असेही रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा : Ram Mandir : 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर; केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी