जळगाव, 28 डिसेंबर : जळगाव शहरासह जिल्ह्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमावावा लागला आहे. अशातच जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. वाढत्या अपघातांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरेश भोळे यांनी आयुष प्रसाद यांच्यासोबत चर्चा करत अपघाताची घटना कमी होण्यासाठी प्रशासनाने योग्य ते पाऊले उचलली पाहिजेत अशापद्धतीच्या सूचना केल्या.
आमदार सुरेश भोळे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट –
आमदार सुरेश भोळे यांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष प्रसाद यांची भेट घेतली. यावेळी जळगाव शहरातून जाणाऱ्या हायवेवर दररोज होणाऱ्या अपघात नागरिकांना जीव गमवावा लागतो आहे. यावर पर्याय व्यवस्था हायवे बायपासचे काम व रस्त्याच्या कामाचा हायवेवर होत असणारे अतिक्रमण याचा आढावा घेतला. तसेच काम लवकरात लवकर पूर्ण व्हावी जेणेकरून नागरिकांच्या जीव डोक्यात राहणार नाही, अशापद्धतीच्या सूचना आमदार भोळे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना केल्यात.
जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ –
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जळगाव शहरात नुकताच डंपरच्या धडकेत एका 9 वर्षीय बालकाला आपला जीव गमावावा लागला होता. यासोबतच गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघाताच्या घटनांमध्ये आतापर्यंत 6 जणांना जीव गमावावा लागला आहे. यावरून जिल्ह्यातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असताना प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive