छत्रपती संभाजीनगर, 30 मार्च : 2008 च्या हिंसाचाराप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला असून या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी त्यांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली आहे. कोणताही पुरावा नसताना राज ठाकरेंच्याविरोधात फौजदारी खटला चालविणे म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल, असे निरीक्षण न्यायालयाने या प्रकरणी नोंदवलंय.
न्यायालयानं काय म्हटलंय? –
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 2008 च्या हिंसाचार प्रकरणाची सुनावणी पार पडत होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी त्यांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी नोंदवलंय.
नेमकं प्रकरण काय? –
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 साली अटक झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती. यासोबतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी परळी-गंगाखेड मार्गावर एसटी बस थांबवून दगडफेक केली होती. दरम्यान, या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांविरोधात सार्वजनिक मालमत्तेस नुकसान पोहचवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
2008 च्या हिंसाचार प्रकरणी राज ठाकरे निर्दोष –
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 2008 च्या हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सुरू होती. दरम्यान, या सुनावणीअंती राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून घटना घडण्याच्या वेळी राज ठाकरे हे तिथे उपस्थित नव्हते. तसेच त्यांनी आंदोलनकर्त्यांना आदेश दिल्याचा कोणताही पुरावा दोषारोपपत्रात नाही, यामुळे त्यांना निर्दोष करण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटलंय.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्यावतीने राज ठाकरे यांच्याविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत दाखल असलेला गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करुन त्यांची निर्दोष सुटका करण्यात आलीय.