जळगाव, 11 नोव्हेंबर : विधानसभा निवडणूकीची धामधुम सुरू असून यात महायुतीचे उमेदवार आमदार राजु मामा यांची आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचारात हजारोंच्या संख्येने नागरीक सहभागी होत आहेत. अशातच आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसेचे विभाग प्रमुख हर्षल माहाडीक यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश –
दर्शन पाटील, पंकज पाटील, मयुर पाटील, दुर्गेश पाटील, आदीनाथ जाधव, कल्पेश पवार, ज्ञानेश्वर भोई, अनुराग तरटे, मनोज कुमार, सागर पाटील, त्रिशुल कोळी, राहुल बढे, सचिन परदेशी, दीपक पाटील, विशाल सपकाळे, मुकेश कोळी, प्रितम सपकाळे, लकी कोळी, हर्षल इंगळे, गणेश सोनवणे, सुरज लोहार, पवन पाटील, राहुल पाटील, बादल साबळे आदी 80 कार्यकर्त्यांनी आमदार राजु मामा यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.
यांची होती उपस्थिती –
भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठलभाऊ पाटील यांच्या प्रयत्नातुन हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी जिल्हा महानगर अध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे, नितीन पाटील, विक्रमभाई तरसोडीया, राजेंद्र घुगे, भारतीताई सोनवणे, रेखाताई वर्मा, अशोक राठी, मनोज भंडारकर, अमित काळे, नीलु आबा तायडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : किशोर आप्पा पाटील यांची हॅट्रिक होणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार? ‘असा’ आहे 1962 पासूनचा इतिहास