नवी दिल्ली, 23 जुलै : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यंदाचे वर्ष निवडणूक वर्ष असल्यामुळे निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. दरम्यान, निवडणुका पार पडल्या असून देशात एनडीए सरकार स्थापन झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
आज अर्थसंकल्प सादर होणार –
नवी दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला समोवारी, 22 जुलैपासून सुरुवात झाली. हे पावसाळी अधिवेशन 22 जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल.
मोठ्या घोषणा होण्याची शक्यता –
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मंगळवारी मोदी सरकारच्या 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचा आणि भविष्यातील ध्येयाचा प्रभावी दस्तऐवज असणारा असेल. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा रोड मॅप देणारा हा अर्थसंकल्प असणार असून जो भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची ब्लू प्रिंट देखील तयार करेल, असे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात म्हटले होते. दरम्यान, शेतकरी, महिला, युवक तसेच उद्योग यांच्या दृष्टीकोनातून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : पुणे हादरले! गर्भपात करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू; आईच्या मृतदेहासह दोन्ही मुलांनाही नदीत फेकले