इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 3 मार्च : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे नुकतेच 24 फेब्रुवारीला वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ येत्या शुक्रवारी 7 फेब्रुवारी 2025 रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यामुळे मागील काही दिवसांपासून प्रकृती अवस्थेमुळे उपचार सुरू होते. दरम्यान, 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यानंतर 24 फेब्रुवारी रोजी पाचोऱ्यातील चिंतामणी कॉलनी भडगाव रोड येथून दुपारी 3 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस सुरूवात झाली. त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यानंतर सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर किशोर आप्पा पाटील यांनी त्यांच्या मातोश्री नर्मदाबाई पाटील यांना अग्निडाग दिला.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त सर्वत्र समजताच, नातेवाईकांसह विविध क्षेत्रातील लोकांनी पाचोऱ्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार पाटील यांच्या मातोश्रींचे अंतिम दर्शन घेतले. दरम्यान, आमदार पाटील यांच्या मातोश्रींच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गर्दीचे नियंत्रण करता यावे यासाठी पाचोरा पोलिसांच्यावतीने बंदोबस्त लावण्यात आला होता.
शुक्रवारी शोकसभेचे आयोजन –
दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येत्या शुक्रवारी 7 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील चिंतामणी कॉलनीतील शिवतीर्थ याठिकाणी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
जाहीर किर्तनाचेही आयोजन –
यासोबतच शुक्रवारी 7 मार्च 2025 रोजी सायंकाळी 8 वाजता ह. भ. प. समाधान महाराज भोजेकर आणि शनिवारी 8 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजता ह. भ. प. गोविंद महाराज वरसाडेकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या किर्तनानंतर सकाळी 10.30 वाजता उत्तरकार्याचा कार्यक्रम होईल. हे सर्व कार्यक्रम पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील चिंतामणी कॉलनीतील शिवतीर्थ याठिकाणी होणार आहेत.
हेही वाचा – Pachora News : आमदार किशोर आप्पा पाटील यांना मातृशोक
हेही वाचा – Pachora News : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री अनंतात विलीन