• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला, मुख्यमंत्री शिंदेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 1, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला, मुख्यमंत्री शिंदेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 1 मे : गेल्या महिनाभरापासून राज्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी असलेल्या काही मतदारसंघाचा महायुतीत जागावाटपाचा पेच निर्माण झाला होता. यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश होता. नाशिक लोकसभा मतदारसंघात तीनही पक्षाकडून दावा करण्यात आल्यामुळे उमेदवारीवरून तिढा कायम होता. मात्र, आज अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.

नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर
नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर

हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर –
महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आला असून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांच्या नावाची घोषणा करत नाशिक मतदारसंघ हा त्यांच्याकडे कायम ठेवला आहे. हेमंत गोडसे यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याविरोधात निवडणुकीचा सामना रंगणार आहे.

लोकसभा निवडणूक – २०२४ साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/R8Ykv8WUXs

— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024

हेमंत गोडसे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात –
शिवसेनेकडून उमेदवारी म्हणून जाहीर करण्यात आलेले हेमंत गोडसे हे सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. लोकसभा निवडणुक 2014 च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळांचा पराभव करत पहिल्यांदा खासदारकी मिळवली. यानंतर ते पुन्हा एकदा निवडून आले. दरम्यान, गोडसे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून हॅट्ट्रिक करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : शिवसेनेत फूट पडल्यानंतर दिली होती एकनाथ शिंदेंना साथ अन् आता मिळाले लोकसभेचे तिकीट, ठाण्यातून मिळाली उमेदवारी

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindemp hemant godsenashik lok sabhaनाशिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page