मुंबई, 20 सप्टेंबर : भाजप आमदार नितेश राणे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील आमदार सतीश चव्हाण यांनी नितेश राणेंवर कारवाई करावी, अशा आशयाच्या मागणीचे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे. यामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नितेश राणे यांची वादग्रस्त वक्तव्ये –
गेल्या काही महिन्यांपासून जाहीर सभांमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे हे धार्मिक द्वेष पसरविणारी, चिथावणीखोर वक्यव्ये करत आहेत. सांगली येथे एका कार्यक्रमात राणे यांनी मगील काही दिवसांपूर्वी हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारी चिथावणी खोर वक्तव्ये केली. त्यानंतर, आता गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी आमदार राणे यांनी सांगलीतील बत्तीस शिराळा येथे एका भाषणात चिथावणीखोर वक्तव्ये केली. दरम्यान, केवळ स्वत:चे राजकारण करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत, असा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे.
आमदार नितेश राणेंवर कारवाई करा –
आमदार सतीश चव्हाण यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटल्यानुसार, आमदार नितेश राणे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने देखील त्यांच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी. दरम्यान, अजित पवार यांच्या आमदाराने पत्र लिहिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार? याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा : Breaking : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार, अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?