सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 26 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यातील विविध मतदारसंघात महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच निर्माण झाला होता. यापैकीच एक म्हणजे एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात रस्सीखेच सुरू होती. अखेर, या मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाटेला आली असून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना याठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आहे.
एरंडोल-पारोळा मतदारसंघात डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी –
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये एरंडोल-पारोळा मतदारसंघातून डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील यांच्याविरोधात डॉ. सतीश पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे राजकीय समीकरण –
एरंडोल-पारोळा मतदारसंघात शिवसेनेकडून अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच याठिकाणी ठाकरे गटाकडून डॉ. हर्षल माने तर शरद पवार गटाकडून डॉ. सतीश पाटील हे निवडणूक लढविण्यासाठी आग्रही होते. दरम्यान, महाविकास आघडीत हा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाटेला आल्यानंतर डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे माजी खासदार ए.टी. पाटील हे देखील भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यासोबतच डॉ. संभाजी पाटील तसेच भगवान महाजन (पाटील) हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीत एरंडोल-पारोळा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाटेला न आल्याने डॉ. हर्षल माने अपक्ष निवडणूक लढविणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर –
- एरंडोल – सतीश अण्णा पाटील
- गंगापूर – सतीश चव्हाण
- शहापूर – पांडुरंग बरोरा
- परांडा – राहुल मोटे
- बीड – संदीप क्षीरसागर
- आर्वी – श्रीमती मयुरा काळे
- बागलान – श्रीमती दीपिका चव्हाण
- येवला- माणिकराव शिंदे
- सिन्नर- उदय सांगळे
- दिंडोरी -श्रीमती सुनीताताई चारोस्कर
- नाशिक पूर्व- गणेश गिते
- उल्हासनगर- ओमी कलानी
- जुन्नर- सत्यशील शेरकर
- पिंपरी- श्रीमती सुलक्षणा शीलवंत
- खडकवासला -सचिन दोडके
- पर्वती- श्रीमती अश्विनीताई कदम
- अकोले -अमित भांगरे
- अहिल्यानगर शहर – अभिषेक कळमकर
- माळशिरस – उत्तमराव जानकर
- फलटण – दीपक चव्हाण
- चंदगड- श्रीमती नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
- इचलकरंजी – मदन कारंडे
हेही वाचा : मोठी बातमी! विधानसभा निवडणूक 2024; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ चार मतदारसंघात महायुतीत बंड