17 एप्रिल, जळगाव : जळगाव शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (MIDC) सेक्टर डी मधील मोरया केमिकल कंपनीमध्ये आज सकाळी मोठा स्फोट झाला. या भीषण आगीत या 20 पेक्षा अधिक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे. दरम्यान, जखमी कामगारांना सुरूवातीला सारा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर आता त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
काय आहे संपूर्ण बातमी? –
जळगाव शहरातील एमआयडीसी सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीत आज बुधवारी सकाळी 9 वाजता आग लागली. या आगीत 25 कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यामध्ये 20 पेक्षा अधिक कामगार भाजले गेले. घटनास्थळी असलेल्या 25 कामगारांपैकी 23 कामगार मिळून आले तर दोन कामगारांचा शोध घेतला असता समाधान पाटील हे मृत अवस्थेत आढळून आले. तर रामदास घाणेकर या कामगाराचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खाजगी व शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. जखमी व भाजलेल्या कामगारांना तातडीने मेहरून येथील सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आगीत मोठी हानी झाल्याची भीती देखील वर्तविली जात असून हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गंभीररित्या भाजले गेलेले रूग्ण –
मोरया कंपनीत लागलेल्या भीषण आगीत हेमंत गोविंद भंगाळे (रा. प्रभात कॉलनी, जळगाव), मयुर राजु खंगार (जुना खेडी रोड, जळगाव), गोपाल आत्माराम पाटील (रा. विखरण) सचिन श्रावण चौधरी (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), दिपक वामन सुवा (रा. विठोबा नगर, जळगाव), किशोर दत्तात्रय चौधरी (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), चंद्रकांत पाटील (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), फिरोज तडवी (रा. रामेश्वर कॉलनी), भिकन पुंडलिक खैरनार (रा. ईच्छादेवी, जळगाव) हे गंभीर रित्या भाजले गेले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर इतर नंदु छगन पवार (रामेश्वर कॉलनी, जळगाव) आनंद जगदेव (रा. रामेश्वर कॉलनी), कपिल राजेंद्र पाटील (रा. आव्हाणे), गणेश रघुनाथ सोनवणे (रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव), चंद्रकांत दशरथ घोडेस्वार (रा. सुप्रिम कॉलनी), विशाल रविंद्र बारी (जुने जळगाव), जनजीवन अनंत परब (अयोध्यानगर, जळगाव), नवाज अमीर तडवी (रा. अशोक किराणा, जळगाव), रमेश अजमल पवार (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
हेही वाचा : मोठी बातमी! एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी, भाजप प्रवेशा आधीच आला धमकीचा फोन